(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray on Maharashtra Budget 2023 : गाजर हलवा अर्थसंकल्प, उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका
Uddhav Thackeray on Maharashtra Budget 2023 : गाजर हलवा अर्थसंकल्प, उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका
Uddhav Thackeray on Maharashtra Budget 2023 : महाविकास आघाडीची सत्ता असता असताना केंद्र सरकार आमच्या बाजूला नव्हतं.. जीएसटीची थकबाकी असायची.. आता महाशक्तीचा पाठिंबा असलेलं सरकार कसं कारभार करतेय तुम्हाला माहितेय.. आज काही शेतकऱ्यांशी बोललो अद्यापही त्यांच्या बांधावर पंचनामा करण्यासाठी अधिकारी पोहचले नाहीत. आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही घोषणा केल्या आहेत. पण शेतकऱ्यांना हमखास भाव कधी येणार, हे पाहावं लागणार आहे. आजच्या अर्थसंकल्प गरजेल तो बरसेल काय? असा आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
अर्थसंकल्पातून मधाचं बोट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गाजर हलवा अर्थसंकल्प आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. बजेटमधून जनतेच्या भावनेचा खेळ करण्यात आला आहे. आम्ही जाहीर केलेल्या योजना नामांतर करुन मांडल्या आहेत. ज्या घोषणा झाल्या त्या प्रत्यक्षात कधी येतील, हे पाहावं लागेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.