(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray Car Attack : ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी राडा करणाऱ्या 44 जणांवर गुन्हा दाखल
Uddhav Thackeray Car Attack : ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी राडा करणाऱ्या 44 जणांवर गुन्हा दाखल
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये आरोप- प्रत्यारोप, टीका या मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत. अशातच या टीकाचे पडसाद आता राज्यभरात दिसून येत आहेत. काही दिवसांपुर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Shivsena Vs MNS) यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींची (Amol Mitkari) गाडी फोडली होती. त्यानंतर राज ठाकरेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला आणि आता काल (शनिवारी) उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) कारवर शेण फेकलं, बांगड्या फेकल्या, नारळ फेकून ताफ्यातील गाड्यांच्या काचा फोडल्या, थेट उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याच्या ठिकाणी घुसून मनसैनिकांनी गोंधळ घातला. ठाण्यात एवढा राडा झाला असतानाही उद्धव ठाकरे असो वा संजय राऊत (Sanjay Raut), यांनी आपल्या भाषणात राज ठाकरेंचा (Raj Thackeray) कोणताही उल्लेख केला नाही. दरम्यान याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत.
नेमकं काय घडलं?
उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackrey) काल ठाण्यातील रंगतनमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यापूर्वी या सभास्थळी मनसैनिक घुसले. सभास्थळी मनसैनिकांकडून गोंधळ घालण्यात आला. पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड सुरु केली. मनसेच्या वतीने उध्दव ठाकरे यांच्या ताब्यातल्या गाडीवर फुगे मारण्यात आले. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरे (Uddhav Theackrey) यांच्या वाहनाखाली टायर जवळ सुपारी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या गाडीवर बांगड्या, टोमॅटो, शेण फेकण्यात आलं, यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या होत्या. या घटनेचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत.