एक्स्प्लोर
Thackeray Brothers: 'भेट कौटुंबिक, पण चर्चा राजकीय?' Raj Thackeray यांच्या भेटीने चर्चांना उधाण
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यात गेल्या तीन महिन्यांत सहाव्यांदा भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 'ही भेट केवळ कौटुंबिक आहे', असे राज ठाकरे यांनी 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर स्पष्ट केले असले तरी, या भेटीत राजकीय डावपेच असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी ठाकरे बंधू ५ जुलै (मराठी विजय मेळावा), २७ जुलै (उद्धव ठाकरेंचा वाढदिवस), २७ ऑगस्ट (गणपती दर्शन), १० सप्टेंबर आणि ५ ऑक्टोबर (राऊतांच्या नातवाचे बारसे) रोजी भेटले होते. आजच्या मातोश्रीवरील (Matoshree) स्नेहभोजनाच्या निमित्ताने झालेल्या भेटीमुळे, राज ठाकरे मवियामध्ये (MVA) सामील होणार की महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरण उदयास येणार यावर पुन्हा एकदा मंथन सुरू झाले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
















