(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Tahckeray PC : मुंबईला अदाणी सिटी करण्याचा मोदी-शाहांचा डाव, ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Tahckeray PC : मुंबईला अदाणी सिटी करण्याचा मोदी-शाहांचा डाव, ठाकरेंचा हल्लाबोल
मुंबई : धारावीचा भूखंड अदानीच्या घशात घालून मुंबईला अदानी सिटी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा डाव आहे. सरकारची लाडका मित्र किंवा लाडका काँट्रॅक्टर किंवा लाडका उद्योगपती योजना सुरु आहे, अशी घणघाती टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. ते शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (Dharavi Redevelopment Project) मुद्द्यावरुन महायुती सरकारला लक्ष्य केले. निवडणुका जवळ आल्या आहेत आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे महाआघाडी सरकार फसव्या घोषणांचा पाऊस पाडायला लागलेले आहे. त्यांना असं वाटतं की, त्यांनी आतापर्यंत जो काही कारभार केलाय तो सगळा कारभार जनता विसरेल आणि फसव्या योजना बळी पडून यांना मतदान करेल. अशी त्यांची एक वेडी आहे. मग या योजनांमध्ये 'लाडकी बहीण' अशा बऱ्याच काही गोष्ट आहेत. बाकीच्या योजनांबाबत मी आज काही बोलणार नाही त्याच्याबद्दल जनता बोलते, जनता अनुभव घेते आहे. आज मी त्यांच्या एका योजनेबद्दल बोलणार आहे आणि ती योजना म्हणजे 'लाडका मित्र' किंवा 'लाडका कॉन्ट्रॅक्टर' किंवा 'लाडका उद्योगपती योजना'. त्या योजनेबद्दल आम्ही गेल्या वर्षी धारावी येथे मोठा मोर्चा काढला होता, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.