(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Udayanraje Bhosale : राज्यपालांनी पदाची मर्यादा ठेवून बोलायला हवं होतं: उदयनराजे भोसले
Satara News Update सातारा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळं राज्यपाल पुन्हा वादात सापडले आहेत. त्यांच्यावर शिवप्रेमींमधून टीका होत आहे. खासदार उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhonsle )यांनी देखील राज्यपालांवर टीका केली आहे. उदयनराजे यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलं आहे की, राष्ट्रमाता जिजाऊ (Jijau) या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) खऱ्या गुरू होत्या तर रामदास हे कधीही गुरु नव्हते. हा खरा इतिहास आहे. तरीही औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देवून चुकीचा इतिहास सांगितला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत, असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.