Nagpur Flyover : नागपूरकरांसाठी नवा उड्डाणपूल, अमरावती महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार
Nagpur Flyover : नागपूरकरांसाठी नवा उड्डाणपूल, अमरावती महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार
नागपूरकरांना मिळाला नवीन उड्डाणपूल... अमरावतीला जाताना आता वाडीत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही... नागपूर - अमरावती महामार्गावर नागपूरच्या वेशीवर होणारी वाहतूक कोंडी आता होणार नाही... कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने विक्रमी वेळेत नागपूर जवळच्या वाडीमध्ये सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधून तयार केला आहे... आज सकाळपासून हा उड्डाणपूल टेस्टिंगच्या उद्दिष्टाने सामान्य वाहन चालकांसाठी सुरू करण्यात आला आहे... वाडी मधील 10 नंबर नाकापासून सुरू झालेला हा उड्डाणपूल अडीच किलोमीटर लांबीचा असून या उड्डाणपुलामुळे वाडी टी पॉइंट वर होणारी वाहतूक कोंडी टळणार असून वाहन चालकांना उड्डाण पुलावरून थेट अमरावतीच्या दिशेने वाडी शहराच्या बाहेर निघता येणार आहे...