Special Report : काय पाऊस ... काय रस्ते... काय खड्डे... सगळं नॉट ओके, मुंबईत खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी
Special Report : राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या नाट्यात आजच्या आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांचं सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं. पण आता सत्तेची खुर्ची स्थिर झाल्यावर तरी त्या समस्या दूर केल्या जाणार आहेत का? पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईच्या रस्त्यावरचे खड्डे पुन्हा चव्हाट्यावर आलेत. त्यामुळं मुंबईकरांना साचलेल्या पाण्यासोबत खड्यातूनही वाट काढावी लागत आहे. मुंबईत पाऊस पडला की रस्त्यावर खड्डे पडणार हे समीकरण जणू ठरलेलं आहे.कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही ते समीकरण बदलत नाहीय. त्यामुळं मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरू असताना, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांवर खड्यांचं जणू साम्राज्य पाहायला मिळतंय. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट.





















