TOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 May 2024 : ABP Majha
मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ, ५ अप्पर पोलीस आयुक्त, २५ पोलीस उप आयुक्त, ७७ सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह २ हजार ४७५ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात.
२० मे रोजी ठाणे लोकसभा मतदारसंघात मदतान, या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यांपासून पोलिसांकडून तयारी सुरु, मतदानावेळी ४ हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असणार.
ठाणे लोकसभेसाठी मतदानाच्या दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावं, ठाणे पोलीस आयुक्त अशितोष डुंबरे यांचे मतदारांना आवाहन.
सर्वांनी मतदान करावं हाच संदेश सर्वांना देण्यासाठी वांद्रे सी लिंकला लाइटिंगच्या माध्यमातून आवाहन, सर्वांचे लक्ष आता 20 मे मतदानाच्या दिवसाकडे.
पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी नाशिक शहरातील मतदान केंद्रांवर ४०० अधिकाऱ्यांसह ३ हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, नाशिक पोलिसांना मध्य प्रदेश पोलिसांची साथ मिळणार.
हा ही व्हिडिओ पाहा
Special Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतो
आरएसएस भाजपची मातृसंस्था मानली जाते. संघाच्या विचारातूनच जनता पार्टी आणि पुढं भाजपचा जन्म झाला हा इतिहासही आहे. पण भाजपचे सध्याचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना आता भाजप सक्षम आहे आणि आधीसारखं संघावर अवलंबून नाही असं वाटतं. नड्डा यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात नुसत्या भुवया उंचावल्या नाहीत तर नड्डा असं कसं बोलले अशी चर्चाही सुरु आहे.. भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्हीच आमचा पक्ष चालवतो, भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचं मोठं वक्तव्य, तर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून सारवासारव... एक दिवस मोदी संघालाही नकली म्हणतील, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा, संघाला संपवायला देखील भाजप मागेपुढे पाहणार नाही, ठाकरेंचा घणाघात...