(Source: ECI/ABP News/ABP Majha)
TOP 70 News : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 16 Sept 2024 : ABP Majha
धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतची बैठक संपली, कायद्याच्या चौकटीत बसवून आरक्षण देण्याचा प्रयत्न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळाला आश्वासन, यासाठी समिती गठीत करण्याच्याही मुख्यमंत्र्यांच्या सूचना.
आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाची हाक, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जरांगेंचं उपोषण.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर, दौऱ्यादरम्यान पंतप्रधान वंदे भारत मेट्रोला, तसेच नव्याने चालू होणाऱ्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार.
हिंदू हा एकमेव सहिष्णू धर्म, राजस्थानच्या अलवरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे वक्तव्य.
लालबागच्या राजाच्या राजेशाही विसर्जन मिरवणुकीची जोरदार तयारी सुरु, पूर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर लालबागच्या राजाची चरणस्पर्श रांग आजपासून बंद, तर मूखदर्शनाची रांगही रात्री १२ पासून बंद.
सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या चरणी अर्पण झालेल्या सोन्याच्या अलंकाराचा लिलाव, आज सकाळी ११ ते ५ या वेळेत लिलाव होणार