TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 19 May 2024 : ABP Majha
कुटुंबप्रमुख म्हणून मी सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये कधीच भेदभाव केला नाही, अनेक मंत्रीपदं दिली त्यामुळे संधी मिळाली नाही ही ओरड निरर्थक, शरद पवारांनी अजितदादांना सुनावलं
मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे नको ही २०१९च्या आधी भाजपचीही भूमिका होती, संजय राऊतांचा मोठा दावा, मविआ बनत असताना अजितदादांनी देखील विरोध केल्याचं वक्तव्य
((सीएमपदी भाजपला शिंदे नको होते-राऊत))
मुंबईसह महाराष्ट्रात उद्या १३ जागांवर मतदान, आज करणार मतदान साहित्याचं वाटप, पोलिसांचं कडक बंदोबस्त
((उद्याच्या मतदानाची जय्यत तयारी))
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर कालपासून
आयकर विभागाचे छापे. ४०कोटींची रोकड जप्त. तर बूट व्यापारी कर चुकवत असल्याची आयकर विभागाकडे माहिती.
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये स्पोर्ट्स कारची दुचाकीला धडक, तरण-तरुणीचा जागीच मृत्यू,
आरोपी वेदांत अग्रवालला घटनास्तळी जमावाकडून बेदम चोप, वेदांत पोलिसांच्या ताब्यात
मुंबईत आज आणि उद्या उकाडा कायम राहणार, हवेतील आर्द्रता प्रचंड वाढल्यानं मुंबईकर घामाघूम
((मुंबईत गरमी, दमटपणा कायम राहणार))
मान्सून आज अंदमानात दाखल होणार, ३१ मे रोजी केरळ आणि ७ जूनला महाराष्ट्रात धडकण्याचा अंदाज
((मान्सून आज अंदमानात धडकणार))
वरंधा घाट वाहतुकीसाठी येत्या ३१मेपर्यंत बंद राहणार. घाट बंद असल्यानं प्रवाशांना ताम्हिणी,आंबेनळी घाटामार्गे प्रवास करावा लागणार.