Top 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : ABP Majha : 09 OCT 2024
Top 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : ABP Majha : 09 OCT 2024
स्वबळावर लढायचं असेल तर काँग्रेसने तसं जाहीर करावं, मग इतर पक्षही आपली भूमिका घेऊ शकतील, संजय राऊतांचा संजय इशारा.
कलम ३७० हटवणं हा भाजपच्या प्रचाराचा भाग होता, जम्मू काश्मीर हे अत्यंत महत्त्वाचं राज्य भाजपने गमावलं, संजय राऊतांचं वक्तव्य.
हरियाणातल्या काँग्रेसचा पराभवानंतर सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला जोरदार टोला, मित्रपक्षांना दूर ठेवल्याचा फटका बसला , जिंकलेल्या डावाचे पराभवात कसं रूपांतर करायचं हे काँग्रेसकडून शिकावं अशी टोलेबाजी.
काँग्रेस राज्यात चौथ्या क्रमांकाचा पक्ष राहील, महाराष्ट्रातही भाजपचं सरकार येईल,भाजप नेते आशिष देशमुखांनी व्यक्त केला विश्वास.
हम साथ साथ म्हणणारे, आता म्हणतायत हम आपके है कौन, काँग्रेसबाबत संजय राऊतांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांचा टोला