TOP 50 Headlines : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 29 August 2024 : ABP Majha
TOP 50 Headlines : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 29 August 2024 : ABP Majha
पुतळा कोसळल्याप्रकरणी सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्यावर फॉरेन्सिकची टीम दाखल, कोल्हापूरमधील पथकाकडून घटनास्थळाची पाहणी
सांगलीच्या जतमध्ये खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांच्याकडून शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक, शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे सरकारच्या निषेधार्थ दुग्धाभिषेक.
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूव सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप. तर फडणवीस कमिशनखोर असल्याची नाना पटोलेंची टीका
भाजपमध्ये सगळे गुंड प्रवृत्त्तीची माणसं आहेत, म्हणून महाराष्ट्र असुरक्षित आहे, नाना पटोलेंची भाजपवर टीका.
विधानसभेला मविआला २०० पेक्षा जास्त जागा मिळतील, नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास.
बदलापूरच्या घटनेवर राजकारण न करता सामाजिक घटना म्हणून हाताळायला हवी, आपण विरोधक असतो तर बदलापूरच्या घटनेचं राजकारण केलं नसतं, माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडेंचा विरोधांना टोला
हिंगोलीत सुरक्षा बाजूला सारुन अजित पवार लाडक्या बहिणींच्या भेटीला, अजित पवारांचं महिलांशी हस्तांदोलन, यावेळी एका महिलेनं अजितदादांना बांधली राखी
अजित पवारांच्या उपस्थितीत हिंगोलीच्या वसमतमध्ये जनसन्मान यात्रा, यात्रेला वसमतकरांचा उत्सफूर्त प्रतिसाद, यावेळी अजित पवारांनी दिली राज्य शासनाच्या योजनांची माहिती.