Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha | 16 June 2024
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha | 16 June 2024
अर्बन नक्षल काही एनजीओमध्ये घुसलेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा आरोप, तर मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्याही याच एनजीओ, शिंदेंचा दावा
विधानसभा निवडणुकीत महायुती १८० जागा जिंकणार, मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास.
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडे राष्ट्रवादीसाठी ८५ ते ९० जागा मागणार, राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल यांची माहिती.
ईव्हीएमवरुन टीका करणाऱ्या राहुल गांधींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका, दोन लोकसभा मतदारसंघातून निवडून येणारे राहुल गांधी त्यांच्या मतदारसंघातील ईव्हीएमला दोष देणार का?, मुख्यमंत्री शिंदेंचा सवाल.
कोकणामध्ये लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश, तडीपार करू म्हणणाऱ्यांनाच कोकणातून तडीपार केलं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचेे आभार, कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मनसे उमेदवाराने माघार घेतल्यामुळे फडणवीसांनी मानले आभार.
राज्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील पण आमच्यासाठी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री, भाजप आमदार गणेश नाईक यांचे मोठं वक्तव्य.
वायकरांच्या मेहुण्याने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन, मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाच्या ऑपरेटरवर गुन्हा दाखल, मंगेश पंडिलकर जवळच्या फोनवर मिळाला ईव्हीएम उघडण्याचा ओटीपी