TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 25 May 2024: 6.30 PM : ABP Majha
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 25 May 2024: 6.30 PM : ABP Majha
सहाव्या टप्प्यात आज देशात लोकसभेच्या ५८ जागांसाठी मतदान पूर्ण, 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पारपडलं मतदान.
सहाव्या टप्प्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५७.७ टक्के मतदान, पश्चिम बंगालमध्ये विक्रमी ७० टक्के, तर उत्तर प्रदेशात सर्वात कमी मतदान.
लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी केलं मतदान, दिल्लीमध्ये बजावला मतदानाचा हक्क.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं मतदान, भारत ही जगातील सर्वात सक्रिय आणि प्रभावी लोकशाही, त्यामुळे मतदान करणं ही आपली जबाबदारी, धनखड यांचं वक्तव्य.
नवी दिल्लीत सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी केलं मतदान, निर्माण भवनमधील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क .
प्रियंका गांधी आणि त्यांच्या मुलांनीही बजावला मतदानाचा हक्क, रेहान वाड्रा आणि मिराया वाड्रा यांनी दिल्लीत केलं मतदान.
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी केलं मतदान, दिल्लीतील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा अधिकार.