TOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 14 June 2024 : ABP Majha
TOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 14 June 2024 : ABP Majha
विधानसभा निवडणूक स्वबळावर नाही तर महाविकास आघाडीतूनच लढणार, एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत संजय राऊतांचं स्पष्टीकरण
भाजपची सुपारी गँग नसती तर मविआच्या ३८ जागा आल्या असत्या, माझाच्या मुलाखतीत संजय राऊतांचा राज ठाकरेंवर घणाघात
लोकसभा निवडणुकीत मराठी माणसानं उद्धव ठाकरेंना मत दिलं नाही, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य...उद्धव ठाकरेंबद्दल लोकांच्या मनात राग असल्याचाही केला दावा.
मुंबईतील मराठी माणसांनी ठाकरेंना मतदान केलं नाही तर आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात त्यांना फक्त ६ हजारांची लीड मिळाली..भाजपच्या मेळाव्यातून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
विधानसभेसाठी स्वबळावर दोनशे ते अडीचशे जागांवर मनसेची चाचपणी...जागांसाठी कुणाच्याही दारात जाणार नाही, राज ठाकरेंची आक्रमक भूमिका...
सुनेत्रा पवारांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल... बिनविरोध निवड होण्याची शक्यता...इच्छुक असूनही डावलल्यानं भुजबळ नाराज असल्याची चर्चा...
भोसरी हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी गुन्हा का दाखल केला नाही याचं कारण समोर, आरोपी विनय नाईकरे पोलीस हवालदाराचा मुलगा असल्यानं प्रकरण दडपल्याचा आरोप
नीट परीक्षेत ग्रेस मार्क मिळालेल्या सर्व १ हजार ५६३ विद्यार्थ्यांचे निकाल रद्द करणार, केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती, १५६३ विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची मुभा