(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 100 Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा : 14 Aug 2024 : ABP Majha
Top 100 Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा : 14 Aug 2024 : ABP Majha
दिवसभरातील महत्वाच्या बातम्या : ....
मुंबई: लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून माझी बहीण सुप्रिया सुळे हिच्याविरोधात माझ्या पत्नीला उमेदवारी देण्याचा निर्णय चुकीची होता, अशी कबुली नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली होती. त्यांच्या या निर्णयावर सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि शरद पवार यांनी मौन बाळगले असले तरी रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत भाष्य केले आहे. यामध्ये रोहित पवार यांनी बारामतीमधून (Baramati Lok Sabha) सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) रिंगणात उतरवण्यासाठी अजितादादांवर गुजरातमधील नेत्यांचा दबाव होता, असे म्हटले आहे.
रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
आदरणीय दादा,
खा. सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती. ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिली, परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगतात. याला तुम्ही ‘चूक झाल्याचे नाव देत असलात’ तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला ‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची’ चर्चा आहे.