Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 28 July 2024
खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग होणार, दुपारी तीन वाजता पाच हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जाणार.
मालेगावातील गिरणा पुलावर तरुणांची स्टंटबाजी, नदीला पूर आलेला असताना वाहत्या पाण्यात 15 ते 20 फुटांवरुन उडी मारत स्टंटबाजी.
सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, घोटगे - परमे पूल पाण्याखाली गेल्याने तीन गावांचा संपर्क तुटला, नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
धुळ्याच्या साक्री तालुक्यातील जामखेड धरण ओसंडून वाहत असल्याचं चित्र, यु आकाराचे हे धरण पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी.
बारामती तालुक्यातील उजणी धरण 36 टक्के भरलं, नागरिकांची पाण्याची चिंता मिटली.
गडचिरोली तालुक्यातील मौजा चांदाळा येथे पुरामुळे शेतात नागरिक अडकले, NDRF च्या टीमने ५९ जणांना बाहेर काढले
पावसाने सह्याद्रीचं सौन्दर्य खुललं, कळसूबाई शिखर रांगेचा भाग असलेल्या शिंदोळा किल्ल्यावरची हे मनमोहक दृश्य खास माझाच्या प्रक्षकांसाठी.