(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 22 July 2024
वर्धा जिल्ह्यात आज पुन्हा पावसाचा यलो अलर्ट, नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन.
आज भंडारा जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून जिल्ह्याला रेड अलर्ट, सर्व शासकीय आणि खासगी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर.
नागपूर -रायपूर राष्ट्रीय महामार्गावर भंडारा शहराजवळील भिलेवाडा ते पलाडी पुलाजवळील रस्त्याचा मलबा कोसळला, त्यामुळे महामार्गावर मोठ्या अपघाताची शक्यता
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार, आज मुसळधार पावसाचा अंदाज, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकारी विनय गौडा यांची घोषणा.
चंद्रपूरच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील माल डोंगरीमधील तलाव फुटल्यामुळे धानोली-पोहा गावात पाणीच पाणी, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तलावाच्या पाण्यात मोठी वाढ, शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली.
गेल्या ३ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे गडचिरोलीतील अनेक गावांचा संपर्क तुटला, खबरदारी म्हणून आज सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर.
गडचिरोलीमध्ये रस्ता वाहून गेल्यानं गरोदर महिलेल्या जेसीबीच्या सहाय्यानं नेल्याचा व्हिडीओ व्हायरल, संबंधित महिला आणि बाळ दोघेही सुखरुप असल्याची डॉक्टरांची माहिती.
नागपूरमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरलं, धान्य, घरातील साहित्यासह कागदपत्रांचंही नुकसान, तर अयोध्या नगर भागातल्या नाल्याला पूर आल्यानं साई मंदिर परिसर पाण्याखाली,