Tondi Pariksha Ujjwal Nikam : उज्ज्वल निकमांनी भाजपलाच का निवडलं...कहाणी काय?: ABP Majha
Tondi Pariksha Ujjwal Nikam : उज्ज्वल निकमांनी भाजपलाच का निवडलं...कहाणी काय?: ABP Majha देशातील निष्णात माजी सरकारी वकील आणि अनेक बड्या खटल्यात सरकारची बाजू मांडून दशतवाद्यांना, गुंडाना शिक्षा भोगायला भाग पाडणारे विधिज्ञ म्हणजे उज्वल निकम (Ujjwal Nikam). निकम यांना भाजपाने उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. आपली उमेदवारी जाहीर होताच निकम यांनी भाजपाच्या कार्यालयात जाऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तर, उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांचे आभारही मानले. तसेच, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची भेटही घेतली. मात्र, भाजपा विद्यमान खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांच्याजागी त्यांना संधी मिळाल्याने पूनम महाजन यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. पूनम महाजन मला नवीन नाही, प्रमोद महाजन हत्याप्रकरणावेळी मी त्यांच्याशी सातत्याने भेटत होतो, चर्चा करत होतो. आता, गेल्या 10 वर्षे त्यांनी या मतदारसंघात त्यांनी काम केलंय, त्यांच्याशी मी चर्चा करुन मतदारसंघातील प्रश्न समजावून घेईल, असेही निकम यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर म्हटले आहे.