Congress Lok Sabha List : काँग्रेसची महाराष्ट्रातली दुसरी यादी जाहीर : ABP Majha
काँग्रेसची महाराष्ट्रातली दुसरी यादी जाहीर झालीय. दुसऱ्या यादीत चौघांना उमेदवारी जाहीर झालीय. बहुचर्चित नागपूरसह रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली या चार मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलीय. नागपुरातून विकास ठाकरे, रामटेकमधून रश्मी बर्वे, भंडारा गोंदियातून प्रशांत पडोळे, गडचिरोलीतून नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर झालीय. नाना पटोले यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवल्याने अखेर डॉ. प्रशांत पाडोळे यांना ही उमेदवारी देण्यात आली. रामटेकसाठी शिवसेना आग्रही होती. मात्र आता या जागेवर काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलीय. चंद्रपूरच्या जागेवर विजय वडेट्टीवार लोकसभा लढवण्यास तयार नसल्याने या जागेचा निर्णय बाकी आहे. काँग्रेसकडून आतापर्यंत 185 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत...
महत्त्वाच्या बातम्या




















