Garud Puran: तुमचा पुढचा जन्म आधीच ठरलेला असतो? 84 लाख योनींचे चक्र काय आहे? गरुडपुराणातील 'हे' रहस्य कमी लोकांना माहित..
Garud Puran: मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते? पुढचा जन्म कोणता मिळतो? आणि तो जन्म आधीच ठरलेला असतो का? हिंदू धर्मातील गरुडपुराणात या प्रश्नांशी संबंधित अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक विचार मांडले आहेत.

Garud Puran: ते म्हणतात ना, माणसाचे कर्म नेहमी चांगले असावे.. मग तो यशाच्या कितीही उंच शिखरावर जाऊ द्या.. गरुडपुराण... हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा पुराणग्रंथ मानला जातो. यात मानवाचे जीवन, मृत्यू, कर्म, पुनर्जन्म आणि मोक्ष यांसारख्या विषयांवर यात विचार मांडले आहेत. गरुडपुराणानुसार माणसाने आयुष्यात केलेल्या चांगल्या-वाईट कर्मांचा त्याच्या पुढील प्रवासावर परिणाम होतो, अशी धारणा यात मांडली आहे. भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितलेल्या ज्ञानाच्या स्वरूपात या ग्रंथाची मांडणी झाल्याची धार्मिक मान्यता आहे. मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते? पुढचा जन्म कोणता मिळतो? आणि तो जन्म आधीच ठरलेला असतो का? हिंदू धर्मातील गरुडपुराणात या प्रश्नांशी संबंधित अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक विचार मांडले आहेत. आज आपण गरुडपुराणानुसार जाणून घोणार आहोत, माणसाचा पुढचा जन्म आधीच ठरलेला असतो की नाही? काय म्हटलंय गरुडपुराणात? जाणून घ्या...
गरुड पुराण - 18 महापुराणांपैकी एक (Garud Puran)
गरुड पुराण हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा ग्रंथ असून, तो 18 महापुराणांपैकी एक आहे. मृत्यूच्या वेळी त्याचे पठण केले जाते. यात प्रामुख्याने भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांच्यातील संवाद मांडण्यात आला आहे. यात जीवन, मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या आत्म्याच्या प्रवासाचे तपशीलवार वर्णन आहे. विशेषतः, यात व्यक्तीच्या कर्मांचे परिणाम, पाप आणि पुण्य यांची तत्त्वे, स्वर्ग आणि नरक, आणि मोक्ष यांचे स्पष्टीकरण दिले आहे. गरुडपुराणातील मान्यतेनुसार, मनुष्याच्या पुढील जन्माचा संबंध त्याच्या कर्मांशी असतो. या जन्मात केलेली चांगली-वाईट कर्मे, त्यांचे परिणाम आणि आत्म्याचा पुढील प्रवास यांचा परस्पर संबंध असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पुढील जन्म हा पूर्णपणे अचानक घडणारी गोष्ट नसून कर्माच्या आधारे त्याची दिशा ठरते, अशी धार्मिक धारणा आहे.
पुढील जन्म कोणता मिळतो?
गरुडपुराणाच्या वर्णनानुसार, जीवाला त्याच्या पूर्वकर्मांनुसार पुढील जन्म किंवा योनी प्राप्त होऊ शकते. सत्कर्म करणाऱ्या व्यक्तीला शुभ फल मिळते, तर चुकीच्या कर्मांचे परिणामही भोगावे लागतात, अशी संकल्पना आहे. याच कारणामुळे हिंदू धर्मात कर्मसिद्धांताला विशेष महत्त्व दिले जाते. आजचे कर्म भविष्यातील जीवनावर परिणाम करू शकते, अशी श्रद्धा आहे.
धर्माचा अनादर करणारे - गरुडपुराण या ग्रंथात सांगितले आहे की, जे लोक धर्म, वेद आणि ईश्वराचा अनादर करतात किंवा जे इंद्रियसुखांमध्ये रमतात, त्यांना मृत्यूनंतर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. अशा लोकांना पुढच्या जन्मात दुःख आणि वंचनेने भरलेले जीवन जगावे लागू शकते.
विश्वासघात आणि फसवणुक - गरुड पुराणानुसार मैत्री अत्यंत पवित्र मानली जाते. जे स्वार्थी कारणांसाठी आपल्या मित्रांशी विश्वासघात करतात, त्यांना पुढच्या जन्मात त्यांच्या कर्मांचे प्रतिबिंब दाखवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे, जे खोटेपणा, फसवणूक आणि कपटाने इतरांना इजा पोहोचवतात, त्यांनाही त्यांच्या कर्मांचे परिणाम भोगावे लागतात.
जीवनाचा शेवटचा क्षण - गरुड पुराणात सांगितले आहे की, जीवनाचा शेवटचा क्षण अत्यंत महत्त्वाचा असतो. त्या वेळी व्यक्तीला येणाऱ्या भावनांचा त्याच्या भावी जीवनावर प्रभाव पडतो. मृत्यूच्या वेळी मन शांत राहिल्यास आणि ईश्वराचे स्मरण झाल्यास, आत्म्याला चांगला आणि उदात्त जन्म मिळू शकतो.जर त्या वेळी मनात लोभ, क्रोध किंवा नकारात्मक विचार असतील, तर त्याचा परिणाम प्रतिकूल होतो आणि आत्म्याला कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.
84 लाख योनींचे चक्र
गरुडपुराणानुसार, शरीर सोडल्यानंतर आत्म्याला आपल्या कर्मांचे पूर्ण फळ भोगावे लागते. असे म्हटले जाते की आत्मा 84 लाख जीवांमध्ये संचार करतो, ज्यापैकी मानवी जीवन सर्वात महत्त्वाचे मानले जाते. हे एकमेव जीवन आहे जिथे माणूस आपले कर्म सुधारू शकतो आणि आपला भविष्याचा मार्ग अधिक चांगला बनवू शकतो. जे चांगली कर्मे करतात त्यांना उच्च आणि आनंदी जीवन मिळते, तर जे वाईट कर्मे करतात त्यांना खालच्या पातळीच्या जीवनात ढकलले जाते.
84 लाख योनींची संकल्पना: जीवाला विविध प्रकारच्या योनींमधून जन्म घ्यावा लागतो, अशी धार्मिक मान्यता आहे.
कर्मानुसार जन्म: जीवाने केलेल्या कर्मांनुसार त्याला पुढील जन्म मिळतो, असे मानले जाते.
जन्म-मृत्यूचे चक्र: जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म यांचा हा क्रम सतत सुरू राहतो, अशी हिंदू धर्मातील धारणा आहे.
मनुष्य जन्माचे महत्त्व: 84 लाख योनींमध्ये मनुष्य जन्म अत्यंत महत्त्वाचा आणि दुर्मिळ मानला जातो.
मनुष्य जन्मात कर्माची संधी: मनुष्याला योग्य-अयोग्य यातील फरक समजून घेण्याची आणि सत्कर्म करण्याची क्षमता मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे.
मोक्षाचा मार्ग: भक्ती, ज्ञान, सत्कर्म आणि आध्यात्मिक साधनेद्वारे जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होणे म्हणजे मोक्ष, असे मानले जाते.
पुढचा जन्म आधीच ठरलेला असतो का?
गरुडपुराणातील पुनर्जन्म आणि मृत्यूनंतरच्या प्रवासासंबंधी विचार हे धार्मिक श्रद्धा व परंपरेवर आधारित आहेत; त्यांना वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले तथ्य मानले जात नाही. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, पूर्वकर्मे पुढील जन्माची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असे गरुडपुराणातून समजते. मात्र, प्रत्येक व्यक्तीचा पुढचा जन्म नेमका कुठे, कोणत्या कुटुंबात किंवा कोणत्या रूपात होईल, याचे निश्चित भाकीत गरुडपुराणाच्या आधारे करता येत नाही. गरुडपुराणाचा मुख्य संदेश असा मानला जातो की, मृत्यू अटळ असला तरी आपल्या कर्मांना महत्त्व आहे. त्यामुळे वर्तमान जीवनात सत्य, दया, दान, धर्म आणि सदाचाराचा मार्ग स्वीकारावा.
हेही वाचा :
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! सूर्याचे पॉवरफुल संक्रमण नशीब पालटणार, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















