एक्स्प्लोर
Thackerya Union : मविआ शिष्टमंडळात आदित्य ठाकरेंसोबत अमित ठाकरेही
महाविकास आघाडी (MVA) आणि मनसे (MNS) यांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेऊन मतदार याद्यांमधील गोंधळावर तीव्र आक्षेप नोंदवला. या भेटीत उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हेदेखील उपस्थित असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. 'लोकशाहीत पारदर्शक निवडणूक प्रक्रिया हीच विश्वासाची पायरी आहे, मतदार याद्यांतील गोंधळ दूर होईपर्यंत निवडणुका घेऊ नका,' अशी थेट मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. या शिष्टमंडळाने बोगस आणि दुबार मतदार नोंदणी, मतदार याद्यांमधील त्रुटी आणि EVM च्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी या सर्व त्रुटी दूर कराव्यात, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षांनी केली. ठाकरे घराण्याच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी, आदित्य आणि अमित ठाकरे, यांचे एकत्र येणे हे भविष्यातील राजकीय बदलाचे संकेत मानले जात आहेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















