एक्स्प्लोर
Raj Uddhav Thackeray Unity ठाकरे बंधूंच्या मेळाव्याची तयारी Superfast News : 4 July 2025 : ABP Majha
उद्याच्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्याबाबतच्या महत्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. हा मेळावा वरळी डोममध्ये होणार आहे. शरद पवार मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत, त्यांच्याऐवजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहतील. नियोजित कार्यक्रमामुळे शरद पवार जाणार नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं. ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत काँग्रेससमत आघाडीच्या आड येणार नाही असं शरद पवारांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. उद्याच्या मेळाव्याला पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. पक्षीय अहंकार बाजूला ठेवून मेळाव्यासाठी झोकून काम करायचं ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं ठरलं आहे. जाहिरातींद्वारे मेळाव्याची जोरदार प्रसिद्धी केली जाणार आहे. मेळाव्यासाठी दोन्ही ठाकरेंच्या पक्षांमधील नेत्यांच्या विशेष टीम तयार करून जबाबदाऱ्यांचं वाटप केले जाणार आहे. घोषणाबाजीतून एकमेकांना डिवचलं जाणार नाही याची काळजी घेण्याची दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आली आहे. पाच तारखेला होणाऱ्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मनसेची बैठक झाली. मेळाव्यासाठी किती लोक जाणार आणि काय नियोजन असेल यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. वरळी डोममध्ये होणाऱ्या मेळाव्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची एकत्र तयारी सुरू आहे. मनसे नेते आणि ठाकरेंचे शिवसेनेचे नेते आज मेळावा स्थळी जाऊन आढावा घेणार आहेत. पाच तारखेच्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्याची आणखी एक पत्रिका समोर आली आहे. मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहण्याचं ठाकरी बंधूंचं आवाहन आहे. वरळी डोमच्या बाहेर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली. कोणत्याही पक्षाचा बॅनर किंवा झेंडा आणण्यात किंवा लावण्यात येऊ नये असं मनसेनं आवाहन केलं होतं, या आवाहनाला ठाकरेंच्या शिवसेनेकडून हरताळ फासण्यात आला. ज्यांनी बॅनर लावला त्यांना ठाकरेंची शिवसेना समज देत दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये कुठलाही श्रेयवाद नाही असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी वक्तव्य केलं. रामदास कदम यांनी खळबळजनक आरोप केला आहे की, राज ठाकरे यांच्या घातपाताचा उद्धव ठाकरेंचा कट होता. रामदास कदम यांनी “राज ठाकरेंच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहिले” असंही वक्तव्य केलं.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement


















