NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
मंगळवारी झालेल्या प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांना माहिती नव्हती, अशी माहिती सुत्रांनी दिलीय, राष्ट्रवादीच्या नेत्यांची काल दुपारी देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली या बैठकीत याबाबतची माहिती उघड झालीय, बैठकीला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, छगन भुजबळ, अनिल पाटील आणि सुनील तटकरे उपस्थित होते, पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडून देवगिरीवरील बैठकीत वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे विचारणा करण्यात आली. तेव्हा
आगामी पावसाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शरद पवारांची राष्ट्रवादी समर्थन देणार आहे त्याचा राष्ट्रवादीने वेगळा अर्थ काढू नये यासाठी मुख्यमंत्र्यांकडून कल्पना देण्यासाठी बोलवल्याची माहिती तटकरेंनी सुनेत्रा पवारांना दिली, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच मंगळवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना बैठकीसाठी वर्षावर बोलावलं होतं का असा सवालही या निमित्ताने उपस्थित होऊ लागलाय. दरम्यान मुख्यमंत्र्यांकडून आशा प्रकारचा संदेश द्यायचा होता तर पक्षाच्या प्रमुख म्हणून सुनेत्रा पवारांना कल्पना का दिली नाही असा सवाल सुनेत्रा पवार यांनी बैठकीत उपस्थित केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिलीये.




















