ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करत आहोत. उच्च न्यायालयासमोर देखील शासनानं आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय-काय पाऊलं उचलत आहोत ते सांगितलंय. न्यायालयाचं देखील समाधान झालं आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरु केलं आहे. अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वचजण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा, अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीची विनंती केलीये.
राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलंय.
![CM Devendra Fadnavis : कोण-कोणाला भेटलं यावर राजकारण नको : देवेंद्र फडणवीस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/3ae832ef4285510d4269bc3cb80c730a1739714059642718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sushma Andhare : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/9d97540725ba735b2742c53d6310338a1739708921135718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/7ae6ccea4938be66aa562bb75ed173081739706263697718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![NCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/ebba958da864f17cdf61f5eb1e96efdd1739703745635718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/34d86dfb433da2bf76b2559a05a98a721739703399881718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)