Special Report Ravindra Waikar | आरोप चुकले, वायकर सुटले? क्लीनचीटवरून विरोधकांचा हल्लाबोल
रविंद्र वायकरांना पोलिसांकडून क्लिन चिट, राजकारण तापलं? | Marathi News शिवसेना खासदार रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट देण्यात आलीय. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईओडब्ल्यूकडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आलाय. मुंबई महानगरपालिकेकडून दाखल झालेली तक्रार गैरसमजातून केल्याचा दावा करण्यात आलाय. रवींद्र वायकर त्यांच्या पत्नी मनिषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरूण दुबे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड लाटून त्यावर पंचतारांकीत हॉटेल बांधण्याचा घाट घालून 500 कोटींचा घोटाळा केल्याचा किरीट सोमय्यांनी आरोप केला होता. या गैरव्यवहारातून पालिकेचा महसूल बुडवल्याचा आरोप करत पालिका अभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.