Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 14 फेब्रुवारी 2022 : सोमवार : ABP Majha
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. गोवा आणि उत्तराखंडमध्ये सर्व जागांसाठी आज मतदान, तर उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्याच्या मतदानात जनता देणार कौल
2. 2022 मधील इस्रोची पहिली यशस्वी झेप, EOS-4 उपग्रहाचं PSLV C-52च्या मदतीनं प्रक्षेपण
3. राफेल विमानांची शेवटची तुकडी पुढील आठवड्यात भारतात, 2016 साली सरकारने केली होती 36 विमानांची खरेदी
4. हिजाब बंदीमुळे धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन, हिजाबप्रकरणावर अमेरिकन IRF राजदूत रशाद हुसेन यांची प्रतिक्रिया
5. 22 हजार कोटींच्या बँक घोटाळ्यावरुन राजकारण तापलं, शेअर बाजारावर परिणाम होणार का? याकडे लक्ष
6. पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावरुन काँग्रेस आक्रमक, देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्याबाहेर आज आंदोलन
7. किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप सुजीत पाटकर यांनी फेटाळले, एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
8. राज्यात रविवारी 3 हजार 502 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 24 तासांत 9 हजार 815 रुग्णांनी केली कोरोनावर मात
9. प्रेमप्रकरणातून पेट्रोल टाकून जाळलं! नाशिकमधील तरुणाची मृत्यूची झुंज संपली; मुलीसह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल
10. सुरेश रैना, इशांत शर्मा, हरभजनकडे आयपीएल फ्रँचाईझींची पाठ, आयपीएलच्या लिलावात तिघेही अनसोल्ड