Sindhururg : 9 ऑक्टोबरपासून मुंबई-सिंधुदुर्ग दरम्यान नियमित विमानसेवा, तिकीट आणि वेळापत्रक ठरलं!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळ येत्या 9 ऑक्टोबर पासून नियमित मुंबई ते सिंधुदुर्ग असा विमान प्रवास सुरू होणार आहे. कोकणात मोठ्या संख्येने देश विदेशातील पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी कोकणात येत असतात. त्यांना आता मुंबई ते सिंधुदुर्ग हा प्रवास काही तासात करता येणार आहे. तर सण समारंभाचा आनंद लुटण्यासाठी कोकणवासीयांना सुध्दा कोणत्याही खड्ड्याविना अवघ्या काही तासात घरी जाता येणार आहे. त्यासाठी अलायन्स एअर या विमान कंपनीने मुंबई ते सिंधूदूर्ग विमान प्रवासाचे वेळापत्रक व तिकीटदर घोषित केले आहेत. ही कंपनी 9 ऑक्टोबर पासून मुंबई ते सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग ते मुंबई अशी नियमित विमानसेवा चालवणार आहे.




















