एक्स्प्लोर
Photo : 'थायलंड'च्या प्रती दगडूशेठच्या पहिल्या गणेशोत्सवाची ड्रोन झलक!
Thailand Ganeshotsav : पारंपरिक ढोल-ताशे, आकर्षक फुलांच्या सजावटीत थायलंडच्या फुकेत शहरात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
Thailand Ganeshotsav
1/10

थायलंडमधील फुकेत शहरातील श्रीमंत गणपती देवालयात गणेश उत्सवाची धामधूम सुरू आहे. मंदिर स्थापनेनंतर हा पहिलाच गणेश उत्सव असल्याने थायलंडमधील गणेश भक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे. (फोटो सौजन्य: स्वप्नील बर्गे)
2/10

थायलंड मधील उद्योजिका आणि फुकेत9 रिअल इस्टेट कंपनीच्या चेअरमन मिस पापाचस्रोम मीपा यांनी पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची फुकेत शहरात प्रतिकृती तयार केली आहे. त्यामध्ये दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
3/10

हे मंदिर जानेवारी 2025 पासून सर्व भक्तांसाठी खुले करण्यात आले असून रोज तिथे 500 हून अधिक भाविक दर्शन घेतात. मंदिरामध्ये सर्व सण उत्सव, वासंतिक चंदन युटी, शहाळे महोत्सव, मोगरा महोत्सव साजरा करण्यात आले आहेत.
4/10

गणेशाच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी फुकेत ओल्ड टाउन परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या मिरवणुकीत पारंपरिक ढोल-ताशे, आकर्षक फुलांच्या सजावटीतील बाप्पांचा रथ आणि भक्तांचा उत्साह पाहायला मिळाले.
5/10

28 ऑगस्ट रोजी ऋषिपंचमी निमित्त सकाळी 9 वाजता महिलांचे सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण आणि विशेष अभिषेक करण्यात आला.
6/10

संध्याकाळी कलावंत ग्रुप (मराठी कलाकार) यांच्या वतीने ढोल ताशा चे वादन करण्यात येणार आले. सिद्धार्थ जाधव, श्रुती मराठे, सौरभ गोखले, प्रसाद सुर्वे खास ह्या वादन करण्याकरिता उपस्थित होते.
7/10

दिनांक 29 ऑगस्ट रोजी दिवसभर अभिषेक पूजन सुरू राहणार असून संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान पुणे येथील ढोलताशा पथकाचा शिवमुद्रा महाकाल हे सादरीकरण हे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
8/10

30 ऑगस्ट रोजीही अभिषेक पूजनाबरोबरच भक्तांसाठी भव्य प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बाप्पा ला छप्पन भोगांचा प्रसाद अर्पण करण्यात येणार आहे.
9/10

दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत अभिषेक पूजन होईल. त्यानंतर संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान गणेश विसर्जन सोहळा पार पडेल. विसर्जन मिरवणुकीत इंदोरचे प्रसिद्ध हनुमान ढोल पथक हे विसर्जन मिरवणुकीच्या आकर्षण आहे.
10/10

उत्सव काळात दररोज सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत मंदिर दर्शनासाठी खुले राहील. सकाळी 8, दुपारी 1.30, संध्याकाळी 3 व रात्री 8 वाजता नियोजित आरती होईल अशी माहिती मंदिराचे विश्वस्त चेतन लोढा यांनी दिली. (फोटो सौजन्य: स्वप्नील बर्गे)
Published at : 28 Aug 2025 11:45 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
बातम्या
राजकारण
मुंबई
























