Shrikant Shinde : डाॅ.श्रीकांत शिंदे घरात आणि बाहेर ; पाडव्यानिमित्त खास गप्पा
Shrikant Shinde : डाॅ.श्रीकांत शिंदे घरात आणि बाहेर ; पाडव्यानिमित्त खास गप्पा
हेही वाचा :
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) स्वत:चा मतदारसंघ सांभाळत सोलापुरात देखील सक्रिय झाले आहेत. बार्शीत (Barshi) महाविकस आघाडीच्या नेत्यांची ताकद वाढण्यासाठी रोहित पवार अॅक्टिव्ह आहेत. करमाळा विधानसभा मतदारसंघात विद्यमान अपक्ष आमदार संजय मामा शिंदे (Sanjay Shinde) यांना मोठा धक्का बसलाय. संजय शिंदे यांच्या सोबत असणाऱ्या अनेक नेत्यांनी रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार नारायण पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे संजय शिंदे (Sanjay Shinde) यांना मोठा धक्का मानला जातोय. दुसरीकडे बार्शीतील वैराग भागाचे नेते निरंजन भूमकर (Niranjan Bhumkar) यांनी अजित पवारांची साथ सोडत रोहित पवारांच्या उपस्थित शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. त्यामुळे निवडणुकीच्या काळात ठाकरेंचे बार्शीचे उमेदवार दिलीप सोपल (Dilip Sopal) यांची ताकद वाढवली आहे. निरंजन भूमकर हे वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष आहेत, त्यामुळे वैराग भागातून सोपलांना ताकद मिळणार असल्याचे बोलले जाते. फडणवीस हे नवीन युगाचे अभिमन्यू नाहीत तर ते नवीन युगाचे जनरल डायर रोहित पवार म्हणाले, आपली लढाई प्रत्येक मतदार संघातील उमेदवार विरुद्ध भाजप अशी आहे. फडणवीस हे नवीन युगाचे अभिमन्यू नाहीत तर ते नवीन युगाचे जनरल डायर आहेत. अंतरवाली सराटी येथे लाठीचार्ज झाला. धनगरांना आरक्षण दिले नाही. मराठा , ओबीसी असे अनेक आंदोलन सुरू होती, ती गुजरातच्या पद्धतीने पायाखाली तुडवायची असते, असे विधान अमित शाह यांनी केले.