(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shrikant shinde Exclusive : सत्तेत असताना आदित्य ठाकरेंनी काही केलं नाही; श्रीकांत शिंदेंची टीका
Shrikant shinde Exlusive : सत्तेत असताना आदित्य ठाकरेंनी काही केलं नाही; श्रीकांत शिंदेंची टीका
राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच इच्छुक उमेदवारांनी आपल्यासाठी पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी व महायुतीमधील काही पक्षांत बंडखोरी होत असून काही पक्षात उमेदवारांचा प्रवेश होत आहे. त्यातच, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रसमध्ये उमेदवारीची संधी मिळत नसल्याने अनेकजण तुतारी हाती घेत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांची भेट घेऊन उमेदवारीसाठी त्यांच्याकडे आर्जव घातली जात आहे. दोन दिवसांपूर्वी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. आता, भाजपमध्ये (BJP) असलेले माजी मंत्री आणि मोहोळ मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले लक्ष्मण ढोबळे (Laxman dhobale) यांनी आपण भाजप सोडत असल्याचे म्हटले. मी दोन दिवसांत आपला राजीनामा भाजपला पाठवून देतोय, आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतोय, अशी घोषणाच लक्ष्मण ढोबळेंनी केलीय.
राज्यातील विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. नुकतेच ढोबळे यांची बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन भाजपचा राजीनामा देण्याची मागणी केली होती. भाजपमध्ये मागील 10 वर्षांपासून डावललं जात असल्याने भाजपला सोडचिठ्ठी देण्याची मागणी या पदाधिकाऱ्यांनी ढोबळे यांच्याकडे केली होती. त्यामुळे लक्ष्मण ढोबळे भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यातच, आता लक्ष्मण ढोबळे यांनी स्वत:च याबाबत माहिती दिली आहे.