Shindola Fort Trek : ॲमेझॉनच्या जंगलाला देखील लाजवेल असा निसर्ग, शिंदोळा किल्ल्याची सफर
Shindola Fort Trek : ॲमेझॉनच्या जंगलाला देखील लाजवेल असा निसर्ग, शिंदोळा किल्ल्याची सफर सह्याद्रीचं सौन्दर्य खुलतं ते पावसाळ्यात . एमेझॉनच्या जंगलालाही लाजवेल अशी निसर्ग संपदा इथं पसरली आहे. माळशेज घाटातील शिंदोळा किल्ल्याच्या ट्रेक दरम्यान सह्याद्रीचं हे सुंदर रूप तुम्हाला अनुभवता येतं . कळसूबाई शिखर रांगेचा भाग असलेल्या या शिंदोळा किल्ल्याची सफर... खास ए बी पी माझाच्या प्रेक्षकांसाठी.
हेही वाचा :
मान्सूनचे आगमन होताच सर्वत्र वातावरण अगदी आल्हाददायक होते, पावसाळ्यात जवळपास सगळ्यांनाच प्रवास करायला आवडतो. त्यामुळे, जेव्हा जेव्हा कोणाला वेळ मिळेल तेव्हा ते प्रत्येक ऋतूत आपल्या आवडत्या ठिकाणी भेट देण्यासाठी बाहेर पडतात. काहींना प्रवासासोबतच अनेकांना साहसी उपक्रमही करायला आवडतात. म्हणूनच रिव्हर राफ्टिंग, स्कायडायव्हिंग, पॅराग्लायडिंग, हायकिंग आणि रॉक क्लाइंबिंगसाठी बरेच लोक डोंगरावर जात असतात. जेव्हा साहसी अॅक्टीव्हिटीजचा विचार केला जातो, तेव्हा अनेकांना ट्रेकिंग आवडते. ट्रेकिंग ही एक गोष्ट आहे, जर तुम्हीही पावसाळ्यात ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी डोंगरावर जात असाल, तर आम्ही तुम्हाला काही उत्तम टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत, ज्या फॉलो करून तुम्ही मान्सून ट्रेकिंग सुरक्षित आणि संस्मरणीय बनवू शकता.