(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar Full Speech : भारत कृषीप्रधान देश, मात्र देशाला कृषी मंत्रीच नाही, केंद्रावर घणाघात
शेतकरी अस्वस्थ आहे. मी काल अमरावतीत होतो. पहिली बातमी वाचायला मिळाली की दहा दिवसांत आजुबाजुच्या जिल्ह्यातील 25 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीय.आम्ही सत्तेवर होतो तेव्हा शेतकऱ्याने आत्महत्या केलीय हे कळाल्यावर तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंह आणि आम्ही त्या शेतकऱ्याच्या घरी गेलो. तेव्हा कळाले की सावकारी पाशामळे त्याने आत्महत्या केली होती. हे समजल्यावर आम्ही दिल्लीला परत गेलो आणि 72 हजार कोटींची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला.हा कृषिप्रधान देश, पण याना शेतकऱ्यांशी काही पडलेले नाही.
आज तीच स्थिती आहे. पण कोणी ढुंकून बघायला तयार नाही. कृषिप्रधान देश आहे पण देशाला कृषिमंत्री नाही.
हा आक्रोश मोर्चा पुण्यापुरता सीमित राहिलेला नाही, त्याचा आवाज देशात गेलाय.त्यातून देशभरात जागृती घडत आहे. ही जागृती बदल घडवणारी ठरणार आहे. शिवछत्रपतींच्या कर्मभूमीतून हा बदल घडवण्याचा संकल्प आम्ही केलाय. तेव्हा तो घडणारच याची मला खात्री आहे.