Sharad Pawar Interview : बीड आणि बारामतीत बोगस मतदान,शरद पवारांची EXCLUSIVE मुलाखत
बीड : राज्यात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) चार टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आज पाचव्या टप्प्यांचे मतदान पार पडत आहे. या वेळी पैसे वाटल्याचे आणि मतदारांवर दबाव आणण्यात आल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. बीड (Beed Election) आणि बारामतीतील (Baramati Election) मतदानात पैशांचा गैरवापर आणि काही व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. यामळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांनी बीड आणि बारामतीत बोगस मतदान झाल्याचा आरोप केला आहे. तसेच या संदर्भात निवडणूक आयोगाकडे कडक कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी या वेळी केली आहे. ते एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले, बीड, पुणे, बारामती लोकसभा मतदारसंघ सोडले तर बाकी ठिकाणी मतदान शांततेत पार पडलं. महाराष्ट्रात कधीच पैशाचा वापर झाला नव्हता. यावर्षी मोठया प्रमाणात पैशांचा वापर झाला. बारामती लोकसभा मतदारसंघात रात्री दोन वाजता एक बँक उघडी होती. आणि तिथून पैसे वाटप होत होते. हा प्रकार घडला आहे. असं कधी झालं नाही पण यावर्षी काही ठिकाणी अशा गोष्टी पाहिल्या मिळाल्या. बीड आणि बारामती मध्ये बोगस मतदान झालं आहे. बीडमध्ये बूथ कॅप्चर करण्याचा प्रकार झाला. बोगस मतदान करणे, लोकांना मतदान करू न देणे हे देखील प्रकार घडले. पुणे जिल्ह्यात देखील असे प्रकार पाहायला मिळेल. यामागे जो आहे त्याच्यावर सक्त कारवाई केली पाहिजे हा माझा आग्रह आहे.