(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shanishingnapur : शनि मंदिरात जाणारा मार्ग भाविकांसाठी खुला
Shanishingnapur : शनि मंदिरात जाणारा मार्ग भाविकांसाठी खुला शनिशिंगणापूर येथील शनी मंदिरात जाणारा भुयारी मार्ग आज पासून भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे... अडीचशे मीटरचा हा भुयारी मार्ग असून भुयारी मार्गामुळे मंदिर प्रवेशद्वारावर असलेल्या वाहतुकीच्या रस्त्यावरील गर्दी कमी होणार आहे... पानस नदी सुशोभीकरण प्रकल्प अंतर्गत शनी मंदिराच्या समोरील बाजूस 55 कोटीची विकास कामे सुरू आहेत यातच हा भुयारी मार्ग असून या मार्गामुळे भाविकांना वाहनताळातून थेट मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत सरळ पोहोचता येणार आहे... मागील दहा वर्षापासून ही विकास कामे सुरू असून आता ही कामे पूर्णत्वाकडे जात आहेत... शनी मंदिर प्रवेशद्वाराकडे येणारा भुयारी मार्ग प्रवाशांसाठी खुला झाल्याने भाविकांना सुविधा निर्माण झाली आहे... या भुयारी मार्गाचा आढावा घेऊन विश्वस्ताशी बातचीत केली आहे आमचे अहमदनगर प्रतिनिधी सुनिल भोंगळ यांनी