Shambhuraj Desai Dagad Fek Vishalgad : कोणीही कायदा हातात घेऊ नये : शंभूराज देसाई
Shambhuraj Desai Dagad Fek Vishalgad : कोणीही कायदा हातात घेऊ नये : शंभूराज देसाई
विशाळगडावर दगडफेक आणि फोडाफोडीची घटना घडलीय. अतिक्रमण हटवण्यासाठी आज सकाळी संभाजीराजे छत्रपती विशाळगडाकडे निघाले होते. त्याच दरम्यान
पुण्याहून आलेला रवींद्र पडवळ यांचा ग्रुप विशाळगडावर पोहचला. त्यावेळी दगडफेक सुरू झाली. त्यावेळी विशाळगडावरून शिवभक्तांचा मोठा ग्रुप खाली आला. त्यानंतर संभाजीराजे विशाळगडाच्या पायथ्याला पोहोचले.
त्याठिकाणी साधारण दोन तास पावसात संभाजीराजे आणि शिवभक्त थांबून होते. शेवटी ५ वाजता जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारच्या वतीने मुख्यमंत्री यांचा निरोप दिला. अतिक्रमण काढून घेतलं जाईल असं आश्वासन सरकारनं दिलं. त्यानंतर संभाजीराजे कोल्हापूरला रवाना झाले.
दरम्यान यावर शंभूराज देसाईंनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात