Big Fight Vidarbh : विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांच्या मतदारसंघात बिग फाईट
Big Fight Vidarbh : विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांच्या मतदारसंघात बिग फाईट
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सभांची एकसष्टी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण पाचही विभाग पिंजून काढले राज्यातील शेतकरी प्रश्न, महागाई, महिला प्रश्न बेरोजगारी असे गंभीर प्रश्न उपस्थित केले मुंबई :- विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आज संपला आहे. राज्यातील विविध पक्षांच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तब्बल ६१ सभांना संबोधित करत सभांची एकसष्टी गाठली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या सभांच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण असे महाराष्ट्राचे पाचही विभाग पिंजून काढले आहे. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्र ३७, मराठवाड्यात ९, विदर्भात २, उत्तर महाराष्ट्र ५, मुंबई - कोकण विभागात ८ सभांचा समावेश होता. या सभांमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. राज्यातील शेतकऱ्यांवर असलेला कर्जाचा बोजा, सोयाबीन, कापूस आणि अन्य पिकांना न मिळणारे भाव, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकला. बेरोजगारीवर बोलताना त्यांनी राज्यातील प्रकल्प राज्याबाहेर कसे गेले, राज्यातील पदे कसे रिक्त आहेत, राज्यात गुंतवणूक आणली जात नाही याबाबत सांगितले. लाडकी बहिण योजनेवर बोलत असताना जयंत पाटील यांनी सामान्य गृहिणी आणि सामान्य जनतेला महागाईचा होणारा त्रास सांगितला. विविध आकडेवारी मांडून महिलांना राज्यात सुरक्षित वातावरण नसल्याचे त्यांनी सांगितले. जयंत पाटील यांनी राज्य सरकारच्या विविध विभागात होणाऱ्या भ्रष्टाचार आणि याच भ्रष्टाचारामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याचे सांगितले. महाविकास आघाडीची पंचसूत्री महाविकास आघाडी सत्तेत आल्यास राज्यात पंचसूत्री राबवली अशी ग्वाही द्यायला जयंत पाटील विसरले नाहीत. या पंचसूत्री अंतर्गत कुटुंब रक्षणासाठी २५ लाख रुपयांपर्यंत विमा कवच मिळणार. महालक्ष्मी योजनेंतर्गत माता भगिनींना तीन हजार रुपये महिना, मोफत बसप्रवास सेवा मिळणार. कृषी समृद्धीसाठी शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार तसेच नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपये प्रोत्साहन मिळणार. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यास जातनिहाय जनगणना करणार, आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटणार. युवकांना उज्ज्वल भविष्यासाठी ४ हजार रुपये दरमहा देणार तसेच राज्यात गुंतवणूक वाढवून रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रयत्न केले जाईल असे ते म्हणाले.