Shaikh Subhan Ali : "मुस्लीम मावळ्यांनी शिवरायांच्या स्वराज्याचा भगवा झेंडा समुद्रात फडकवला"
Shaikh Subhan Ali : "मुस्लीम मावळ्यांनी शिवरायांच्या स्वराज्याचा भगवा झेंडा समुद्रात फडकवला"
जेव्हा शिवाजी महाराजांना आरमार स्थापन करायचे होते, तेव्हा सिंधूबंदी म्हणजेच समुद्र ओलांडल्याने पाप लागते या भावनेतून हिंदू सैनिक समुद्रात जायला तयार झाले नाही... अशा वेळेस मुस्लिम सैनिकांनी साथ दिली आणि मुस्लिम मावळ्यांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा भगवा झेंडा समुद्रात फडकला असं वक्तव्य दंगल मुक्त महाराष्ट्र या संघटनेचे संयोजक शेख सुभान अली यांनी नागपुरात केलं... नागपुरात काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार मोतीराम मोहाडीकर यांच्या समर्थनार्थ सभा झाली. या सभेत बोलताना शेख सुभान अली यांनी ही वक्तव्यं केली. रत्नागिरी येथील संत याकुत बाबा या मुस्लिम संताला शिवाजी महाराज यांनी त्यांचे गुरु मानले होते.. नंतरच्या काळात तिथे मशिदसाठी महाराजांनी याकुत बाबांना 653 एकर जागा ही दिली होती. या वक्तव्यांनी वाद होऊ शकतो.. दंगल मुक्त महाराष्ट्र या संघटनेचे संयोजक शेख सुभान अली यांची आज नागपुरात काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार मोतीराम मोहाडीकर यांच्या समर्थनार्थ सभा झाली. या सभेत बोलताना शेख सुभान अली यांनी ही वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. 'मुस्लिम मावळ्यांनी शिवरायांच्या स्वराज्याचा भगवा झेंडा समुद्रात फडकवला' मोतीराम मोहाडीकरांच्या समर्थनार्थ नागपुरात झालेल्या सभेदरम्यान वादग्रस्त वक्तव्य