Maharashtra School : राज्यात 20 महिन्यानंतर शाळा सुरू, बच्चे कंपनीचा वर्गात किलबिलाट
Maharashtra School Reopen : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जवळपास दोन वर्ष शाळा बंद होत्या. या काळात विद्यार्थांचं ऑनलाइन शिक्षण सुरु झालं होतं. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पण दक्षिण आफ्रिकेत आढलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्यानं सावध पवित्रा घेताला आहे. मुंबई, पुण्यासह काही जिल्ह्यातील शाळा 15 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. पण महाराष्ट्रातील ग्रामिण भागातील शाळा आजपासून सुरु होणार आहेत.
शाळांमध्ये विद्यार्थांना कोरोना नियमांचं पालन सक्तीचं करण्यात आलं आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग यासारख्या नियमांचं पालन करणं विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना करावं लागणार आहे. राज्यातील ग्रामिण भागातील शाळांमध्ये विद्यार्थांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पालक आपल्या पाल्यांना घेऊन शाळेत आले होते. काही ठिकाणी ढोल ताश्यांमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं होतं. तर काही ठिकाणी फुगे-चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं होतं. पाहूयात राज्यात कुठे-कुठे शाळा सुरु झाल्या आहेत..