Satej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतो
Satej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतो
काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा ऑफिसवर इंडिया आघाडीची तातडीची बैठक बैठकीला सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीचे घटक पक्ष कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात घडलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन. आजच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीला कसं सामोरे जायचं याबाबत विचारमंथन. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतून मधुरीमाराजे छत्रपती यांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता
हे ही वाचा..
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी अनेकांनी अर्ज मागे घेतले असून अनेक बंडखोर रिंगणात कायम असल्यानं मविआ आणि महायुतीला जबर धक्के बसले आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेससाठी शिवसेनेने अर्ज मागे घेतल्याचे दिसून आले. मात्र, काँग्रेसनं आभार मानण्याऐवजी भाजपचे उमेदवार अतुल सावे यांनी आभार मानत खैरेंचे पाय धरल्याचे दिसले. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजू वैद्य यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजप आनंदल्याचे चित्र होते. काँग्रेसनं आभार मानायचे तर भाजपचे औरंगाबात पूर्वचे महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी आभार मानत खैरेंचे पाय धरल्याचे दिसले. कारण होतं एमआयएम कडून इम्तियाज उभा आहेत आणि त्यामुळे हिंदू मतांचे विभाजन होऊ नये!
महायुतीत 3 आघाडीत 2 मतदारसंघात बंडखोरी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीत तीन तर महाविकास आघाडत दोन मतदारसंघात बंडखोरी झाल्याचे दिसले. उर्वरित मतदारसंघात बंडखोरी शमवण्यात महायुतीला आणि मविआला यश आल्याचे चित्र होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत सोमवारी दुपारी ३ वाजता संपली. दरम्यान, औरंगाबाद पूर्व मतदारसंघात सर्वाधिक 29 उमेदवार आहेत. याच मतदारसंघातून उद्धवसेनेच्या राजू वैद्य यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपने सुस्कारा सोडल्याचे चित्र होते.