(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Shirsat on Lok Sabha : शिंदेंच्या 12 खासदारांना पुन्हा संधी मिळणार? कुणाकुणाची नावं?
Sanjay Shirsat on Lok Sabha : शिंदेंच्या 12 खासदारांना पुन्हा संधी मिळणार? कुणाकुणाची नावं?
भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिंकलेल्या 22 जागांवर तसेच अमरावतीमधून नवनीत राणा आणि चंद्रपूरमधून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केल्याने भाजपचे 24 जागांवर निश्चित उमेदवार झाले आहेत. मात्र, भाजपची यादी जाहीर होऊनही महायुतीमधील शिंदे गटाची आणि अजित पवार गटातील उमेदवारांची यादी कधी येणार याबाबत अजूनही चर्चा सुरूच आहे.
शिंदे गटातील 12 खासदारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब
मात्र, आता शिंदे गटातील पाठिंबा दिलेल्या खासदारांची उमेदवारी सुद्धा निश्चित झाली आहे. शिंदे यांना साथ दिलेल्या तेरापैकी 12 खासदारांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे. आज (28 मार्च) वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर 12 खासदारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे बोललं जात आहे. यामध्ये शिंदे गटाला पाठिंबा दिलेल्या कोल्हापुरातील दोन्ही खासदारांच्या समावेश आहे. त्यामुळे कोल्हापूरमधून संजय मंडलिक आणि हातकणंगलेमधून धैर्यशील माने हेच रिंगणात असणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.