Sanjay Raut Full PC : मोदींना दाखवण्यासाठी 27 कॅमेरे, ध्यानमग्न माणूस कॅमेराकडे बघत नाही
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत पैसे वाटले, असा आरोप केला होता. या आरोपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राऊतांना नोटीस पाठवली आहे. तीन दिवसांत माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा असा इशारा शिंदे यांनी राऊतांना दिला आहे. यावरच आता राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, असं म्हणत राऊतांंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलीय. ते आज (1 जून) पत्रकार परिषदेत बोलत होते.
त्यांनी कोर्टात खटला दाखल करावा, काहीही अडचण नाही
मी आजच भारतात आलो. परदेशात असताना मला नोटीस आल्याचे समजले. राज्यातील सरकार बेकायदेशीर आहे, जे सरकार भ्रष्टाचारातूनच निर्माण झाले आहे. डुक्कर ज्या प्रमाणे चिखलातच असते, त्या प्रमाणे हे भ्रष्टाचाराच्या चिखलातील डुकरं आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या घटनाबाह्य सरकारवर मी भ्रष्टाचाराचा आरोप केला म्हणून मला नोटीस पाठवण्यात आली. मी ही नोटीस स्वीकारलेली आहे. त्यांनी या प्रकरणात माझ्याविरोधात कोर्टात खटला दाखल कारावा. माझी काहीही अडचण नाही, असं खुलं आव्हान संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं