Sanjay Raut PC : बारामती आता सोपी राहिली नाही, अजितदादांनी आधी जिंकून दाखवावं : संजय राऊत
Sanjay Raut PC : बारामती आता सोपी राहिली नाही, अजितदादांनी आधी जिंकून दाखवावं : संजय राऊत
निकाल लागल्यावर कळेल की कोण किंगमेकर आहे आणि कोण किंग - 23 तारखेला राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघा़डीचं सरकार स्थापन होईल - अजित पवारांसकट सगळ्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी आधी निवडणुकाीत निवडून या - कोण काय बोलतंय, आणि निवडणूक काळात कोण आरोप करतंय हे फारसं गांभिर्यानं घ्यायचं नसतं - आघाडीमधे काही जागा मित्रपक्षांना सोडायच्या असतात - कोणताही पक्ष आपल्या जिंकून आलेल्या जागा सोडायला तयार नसतं..त्याप्रमाणे काही जागा आम्ही मिळवू शकलो नाही - भिवंडीचे आमचे नेते रूपेश म्हात्रे यांनी हे समजून घ्यावं की समाजवादी पक्षाचे उमेदवार हे त्यांचेे विद्यमान आमदार आहेत..त्यामुळे आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करूनही ती जागा आम्हाला मिळाली नाही - महाराष्ट्रात मैत्रीपूर्ण आम्ही लढणार नाही..महाराष्ट्रात अशा सात ते आठ जागा आहेत जिथे आमच्या विरूद्ध आमचा माणूस आहे..त्यांना आम्ही अधिकृत उमेदवार मानत नाही - आमच्याकडे आज आणि उद्या वेळ आहे त्यांना आम्ही समजावू..आणि एकास एक लढत होईल याची आम्ही काळजी घेऊ - 288 जागांपैकी काही ठिकाणी चुका होत असतात..आम्ही बऱ्याच ठिकाणी जागांची अदलाबदल केली आहे - सोलापूर दक्षिणमधे काँग्रेसनं कुणालाही अधिकृत एबी फॉर्म दिला नाहीये..त्यामुळे ती जागा आमच्यासाठी आहे - सांगोला, अलिबाग, पेण आणि पनवेल याठिकाणी शेकाप आमच्यासमोर आहे..त्यातल्या अळिबाग, पेण आणि पनवेल याठिकाणी शेकापशी चर्चा होऊ शकते..सांगोला आम्ही सोडणार नाही - देवेंद्र फडणविसांची एवढी सुरक्षा वाढवली तर त्यांना धोका कुणापासून आहे हे आम्हाला कळायला हवं - एकनाथ शिंदेंच्या धमक्या कुणाला आणि कशासाठी असतात हे माझ्यापेक्षा जास्त चांगलं कुणालाच माहिती नाही - एकनाथ शिंदे हे भाजपचेच मुख्यमंत्री आहेत..त्यांना भाजपच्याच चपला उचलाव्या लागताील. - -------------------------------------------------