(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut Full PC : सत्ताधारी पक्षांकडून उमेदवारांना पैशांचं वाटप - संजय राऊत
Sanjay Raut Full PC : सत्ताधारी पक्षांकडून उमेदवारांना पैशांचं वाटप - संजय राऊत
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड (Maharashtra Vidhansabha Election 2024) या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोज आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद आयोजित करणार आहे. मात्र या आधीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा दावा केलाय. संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाने निवडणुका निष्पक्षपणे घ्याव्यात. कोणत्याही दबावाखाली निवडणुका घेऊ नये. विरोधकांना अकारण छळू नये, त्रास देऊ नये. निवडणुकीत पैशाचा आणि यंत्रणेचा जो दुरूपयोग केला जातो, तो रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने जागरूक रहायला हवं. काही दिवसांतच आचारसंहिता लागेल हे लक्षात घेऊन राज्यातील सत्ताधारी पक्षांपैकी काहींनी आपापल्या उमेदवाराकडे काल रात्रीपर्यंत पैशांचं वाटप केले आहे. प्रत्येक मतदारसंघातील उमेदवाराकडे साधारण 10 ते 15 कोटी रुपये पोहोचले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने कानाचे पडदे स्वच्छ करून ऐकावे सत्ताधाऱ्यांकडून उमेदवारांना पैशांचे वाटप करण्यात आले हे सगळं वाटप झाल्यानंतरच निवडणुकांची घोषणा होत आहे का? असेही संजय राऊत म्हणाले. याबाबत तुम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहून काही फायदा होणार आहे का? पत्र लिहून जरा फायदा झाला असता तर गेल्या काही वर्षात अनेक विषयांवर आम्ही पत्र लिहिली. खास करून आमच्या मुंबईमध्ये अमोल किर्तीकरांचा 48 मतांनी पराभव झाला. निवडणूक अधिकाऱ्यांनीच हा पराभव घडवण्यात सत्याधारांची मदत केली. त्याबाबत आम्ही बरीच पत्र लिहिली. मुख्यमंत्री त्यांच्या हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये पैशांच्या बॅगा कशा पद्धतीने उतरवत होते, त्याचा व्हिडिओ मी निवडणुका आयोगाकडे दिला. तरी त्याच्यावर कारवाई नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने आपल्या कानाचे पडदे स्वच्छ करून ऐकावे एवढीच आमची अपेक्षा असल्याची टीका संजय त्यांनी केली आहे.