Sanjay Raut on BJP : मैत्री असली म्हणजे आम्ही भाजपसोबत सरकार बनवणार असं नाही : संजय राऊत
मुंबई : दोन दिवसीय विधिमंडळाच्या अधिवेशनात खडाजंगी रंगण्याची शक्यता आहे. विरोधक मंत्री आणि नेत्यांना घेरण्याची शक्यता असल्यानं सत्ताधारीही भाजपच्या नेत्यांविरोधात आक्रमक होण्याची चिन्ह दिसत आहेत. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या अग्रलेखातून असे संकेतही मिळाले आहेत. राज्य सरकारनं स्मार्ट सिटी घोटाळ्यात कारवाई करावी अशी मागणी करत सामनातून भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधला जातोय.
"अनिल देशमुखांपासून अनिल परब, प्रताप सरनाईक, रोहित पवार, अजित पवारांवर कारवाया करुन महाराष्ट्र सरकारची कोंडी करता येईल, या भ्रमात विरोधी पक्षाचे भोपळे आहेत. या भोपळ्यांनी कितीही टुणूक टुणूक केले तरी सत्तेचा सोपान त्यांना पार करता येणार नाही.", असं म्हणत सामना अग्रलेखातून विरोधकांवर तोफ डागण्यात आली आहे. तसेच भाजपचे उपरे पुढारी प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांच्या कंपनीचा कोट्यवधी रुपयांचा स्मार्ट सिटी घोटाळा समोर आला आहे. ईडीनं याप्रकरणी डोळे मिटून दूध पिण्याचं ठरवलं असेल, तर राज्याच्या आर्थिक गुन्हे विभागानं तत्का






















