राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एकही आमदार फुटणार नाही, रोहित पवारांना विश्वास, संजय दिना पाटलांवरही टीका
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एकही आमदार फुटणार नाही, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त
Rohit Pawar : शिवसेना शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर सस्केसफुल झालं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिंदे गटा प्रवेश केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार देखील फुटणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एकही आमदार फुटणार नाही, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. तसेच यावेळी रोहित पवारांनी शिंदे गटात नुकताच प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांच्यावरही टीका केली.
सत्तेत गेल्यानंतर काही नेत्यांच्या वागणुकीत अहंकार
खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी अरेरावी केल्याच्या प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सत्तेत गेल्यानंतर काही नेत्यांच्या वागणुकीत अहंकार दिसून येत असल्याची टीका त्यांनी केली. तसेच राष्ट्रवादी मधील आमदार फुटणार असल्याच्या चर्चेवर भाष्य करीत या चर्चेला पूर्णविराम देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. लातूर दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना आमदार रोहित पवार यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्या वर्तनावर भाष्य केले. पत्रकारांशी अरेरावी करणे योग्य नसल्याचे सांगत, महाविकास आघाडीत असताना त्यांच्याकडून अशा प्रकारची भाषा ऐकायला मिळाली नव्हती, अशी टीका त्यांनी केली. सत्तेत गेल्यानंतर काहींच्या डोक्यात अहंकार जातो, असेही ते म्हणाले...
आमचे आमदार आणि खासदार कुठेही जाणार नाहीत
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार फुटल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदार फुटणार असल्याच्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. आमचे आमदार आणि खासदार कुठेही जाणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करून केंद्र सरकारला आवश्यक असलेली राजकीय ताकद आधीच मिळाल्याने आता विरोधी पक्षांतील लोकप्रतिनिधींना फोडण्याची गरज उरलेली नाही, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.
Before You Go
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
महत्त्वाच्या बातम्या






















