एक्स्प्लोर

'एकट्याने किती दिवस पक्षाची पालखी सांभाळायची?' शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंचा तडकाफडकी राजीनामा; कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेत खदखद सुरुच

पक्षाला कोल्हापूर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत फारसे यश मिळालेलं नाही. महापालिकेत त्यांचा एकमेव नगरसेवक निवडून आला होता. दुर्दैव म्हणजे या कमकुवत स्थितीनंतरही पक्षातील गटबाजी संपलेली नाही.

Kolhapur News: कोल्हापूर जिल्हा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकरण इंगवले यांनी आपल्या पदाचा तडखापडकी राजीनामा दिला आहे. गेल्या वर्षीच त्यांची या पदावर नियुक्ती झाली होती, मात्र एक वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. राजीनाम्याचे मुख्य कारण पक्षातील दोन गटांतील सातत्याने होणारा वाद आणि तक्रारी असल्याचे सांगण्यात येत आहे. इंगवले यांनी आक्षेप घेतला आहे की, त्यांना पक्षात कोणाचीही मदत मिळत नाही आणि "आपण एकट्याने किती दिवस पक्षाची पालखी सांभाळायची?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पक्षात समन्वयाचा मोठा अभाव

दुसरीकडे पक्षात संजय पवार, विजय देवणे आणि रविकरण इंगवले यांसारखे ताकदीचे नेते असूनही त्यांच्यामध्ये समन्वयाचा मोठा अभाव असल्याचे दिसून आलं आहे. या नेत्यांमधील अंतर्गत वादामुळे पक्षाची एकूण ताकद कमी होत आहे. पक्षाला कोल्हापूर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत फारसे यश मिळालेलं नाही. महापालिकेत त्यांचा एकमेव नगरसेवक निवडून आला होता. दुर्दैव म्हणजे या कमकुवत स्थितीनंतरही पक्षातील गटबाजी संपलेली नाही.

कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल

काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे शहर प्रमुख मंजित माने यांच्यासोबतची त्यांची कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. इंगवले यांनी आपला राजीनामा पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठवला असून, आता नवीन जिल्हाध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मी तुझा कामगार नाही, माझ्याकडून वाचणार नाहीस

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रविकिरण इंगवले यांनी कोल्हापूर शहरप्रमुख मंजित माने यांना तू उद्या सकाळी उजडून दाखव, अशी फोनवरून धमकी दिली. तुझ्या अरूण दुधवडकर यांना फोन सांग, असा इशाराही दिला. दोघांत संभाषण झालेली खळबळजनक ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून, ठाकरे सेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

इंगवले यांनी माने यांना फोन करून सुनील जोशींना तुम्ही इंगवलेंची माणसं असं का म्हणता? अशी विचारणा केली. त्यावर माने यांनी मी तसे म्हटले नसल्याचे सांगून त्यांना कॉन्फरन्स कॉलवर घेण्यास सांगितले. त्यावर इंगवले, मी तुझा कामगार नाही असे म्हटले. तसेच तुझ्या दारात पाच मिनिटांत येतो, असे आ‍व्हान दिले. त्यावर माने यांनीही या मी बाहेर आहे, दहा मिनिटांत पोहोचतो, असे प्रतिआव्हान दिले. इंगवले यांनी, तू बालगोपाल, खंडोबा तालमीकडून वाचलास, माझ्याकडून वाचणार नाहीस, अशी धमकी मानेंना दिली. त्यावर मानेंनी इंगवले यांना वाचायचा संबंधच नाही, असे सुनावले.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा
साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
Embed widget