एक्स्प्लोर

Maharashtra Epstein Files : 'आता सगळं उघड होणार!' अशोक खरातवरील 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'चा टीझर रिलीज; रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दिपाली सय्यद, पहिला लूक चर्चेत

Maharashtra Epstein Files Teaser : रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा पहिला लूक समोर आला महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.

मुंबई : राज्यभर गाजलेल्या भोंदू अशोक खरातवर (Ashok Kharat) आधारित असलेल्या महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स (Maharashtra Epstein Files) या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. त्यामध्ये रुपाली चाकणकरांच्या (Rupali Chakankar) भूमिकेतील अभिनेत्री दिपाली सय्यद (Rupali Chakankar) यांचा पहिला लूक समोर आला आहे. त्याचवेळी अशोक खरातच्या भूमिकेत नेमकं कोण आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही.

'आता सगळं उघड होणार...!' ही टॅगलाईन घेऊन येणारा हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार असून त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी उघड होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. 

Ashok Kharat Movie : अशोक खरातच्या कारनाम्यावर चित्रपट

नाशिकमधील भोंदू अशोक खरातने अनेक महिलांना त्याच्या जाळ्यात ओढत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं. राज्यातील अनेक बडे राजकारणी, अधिकारी, प्रतिष्ठित लोक हे या भोंदूचे भक्त असल्याचं समोर आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातशी आर्थिक संबंध असल्याचं उघडकीस आलं. याच प्रकरणात रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.

अशोक खरातच्या या सर्व कारनाम्यावर आता चित्रपट तयार होत असून येत्या 2 ऑक्टोबर रोजी तो प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाचा एक टीझर नुकताच रिलीज झाला असून त्यामध्ये रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत असलेल्या दिपाली सय्यद यांचा पहिला लूक समोर आला.

Rupali Chakankar Maharashtra Epstein Files : रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दिपाली सय्यद 

या टीझरमध्ये अभिनेत्री या भोंदू खरातच्या डोक्यावर छत्री धरताना दिसत आहेत. अशोक खरातचा कारनामा उघडकीस आल्यानंतर रुपाली चाकणकरांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यामध्ये रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या डोक्यावर छत्री धरताना दिसत आहेत. नेमका हाच प्रसंग या टीझरमधून समोर आणण्यात आला आहे. 

Maharashtra Epstein Files Story : कोणकोणत्या गोष्टी उघड होणार? 

दरम्यान, 'आता सगळं उघड होणार...!' हि टॅगलाईन हा चित्रपट अनेकांचा पर्दाफाश करणार असल्याचे संकेत देण्यासाठी पुरेशी आहे. आता हा चित्रपट कोणकोणत्या गोष्टी उघड करतो, ते प्रदर्शनानंतरच समजेल. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अनेकांचे सभ्यतेचे मुखवटे आपोआप गळून पडणार आहेत.

'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटाची कथा सध्या तरी गुलदस्त्यात असून, कलाकारांची नावेही गुप्त ठेवण्यात आली आहेत. या चित्रपटाची कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहीली असून, पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. डिओपी आकाश काकडे या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करणार असून, कला दिग्दर्शन अक्षय आंबेकर करणार आहेत. वेशभूषा आकांक्षा गांधी यांची असून, सचिन घणवंत या चित्रपटाचे प्रोडक्शन हेड आहेत तसेच नेहा घोडके प्रॉडकशन कंट्रोलर म्हणून काम पाहणार आहेत.

ही बातमीव वाचा: 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf On Sachin Pilgaonkar: 'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Embed widget