'पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी योजनेत 700 कोटींचा घोटाळा', संजय राऊतांचा आरोप; सोमय्यांना पत्र लिहून आव्हान, म्हणाले...
Sanjay Raut Letter To kirit Somaiya : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पत्र लिहलंय. पिंपरी चिंचवडमध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली 700 कोटींच्या निधीबाबत झालेल्या गैरव्यवहाराबाबत सोमय्यांना हे पत्र लिहलं आहे. 11 ऑक्टोबरला संजय राऊतांनी हे पत्र लिहलं होतं. भाजपची सत्ता असणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्मार्ट सिटी योजनेत 700 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊतांनी केला आहे. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवडमधला घोटाळा हे तर पहिलं नाव आहे. अशी आपण 100 नावं जाहीर करणार आहे, असंही संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे. याविषयी कालच संजय राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्यांना पत्र लिहिलं. या घोटाळाप्रकरणी ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) कारवाईसाठी पाठपुरावा करण्याचं आव्हान केलं आहे. तसेच, सोमय्या या माहितीच्या आधारे ईडीकडे घोटाळ्याच्या चौकशीसाठी पाठपुरावा करतील, अशी संजय राऊत यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. ईडी, सीबीआय चौकशीसाठी सोमय्यांनी पुढाकार घ्यावा, असं आव्हानही संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना दिलं आहे.