Sunil Deshmukh Died : महाराष्ट्र फाऊंडेशन अमेरिका पुरस्काराचे प्रवर्तक सुनील देशमुख यांचं दु:खद निधन
महाराष्ट्र फाऊंडेशन अमेरिका पुरस्काराचे प्रवर्तक सुनील देशमुख यांचं दु:खद निधन झालंय.मूळचे सांगलीचे असलेल्या सुनील देशमुखांनी अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला. १९७० मध्ये ते पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. तिथे त्यांनी केमिकल इंजिनिअरिंग सह एम.बी.ए आणि डे.डी ही कायद्याची पदवीही घेतली. अमेरिकेत वकिली करण्याचा परवनाही त्यांनी प्राप्त केला. महिला सक्षमीकरणासाठी अमेरिकेत केलेल्या कामाबद्दल त्यांना न्यूयॉर्कमधील 'टाइम स्क्वेअर'मध्ये श्रीमती हिलरी क्लिंटन यांच्यासमवेत 'फुल वीक सॅल्यूट'चा सन्मान मिळाला. मराठी भाषा, समाज आणि संस्कृती याबद्दल त्यांना प्रेम आणि कळकळ होती. आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्र फाउंडेशनला एक कोटी रुपयांची देणगी देऊन १९९४ पासून महाराष्ट्र फाउंडेशनची मराठी साहित्य पुरस्कार ही योजना सुरु केली. तर देशमुख हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पाठीराखे होते